असे भडकले खाद्यतेल
सूर्यफूल तेलाचा भाव पूर्वी 120 रुपये प्रति किलो होता. आता त्यात किलोमागे 20 रुपयाची भाव वाढ झाली. सूर्यफूल तेल प्रति किलो 140 रुपयांवर पोहचले. पाम तेलाचा भाव 100 रुपये प्रति किलो होता. हा भाव आता 135-140 रुपयांवर पोहचला आहे. किलोमागे पाम तेल 35-40 रुपयांनी महागले आहे. तर सोयाबीन तेल 115-120 रुपये प्रति किलोवरून थेट 130-135 रुपयांवर पोहचले आहे. किलोमागे 20 रुपयांची दरवाढ दिसून येत आहे. ऐन थंडीत ग्राहकांना वाढीव दराने तेल खरेदी करावे लागत आहे. या महागाईने किचन बजेट कोलमडले आहे.