व्हॉट्सअॅप कॉल शेड्यूल कसं अॅक्टिव्ह कराला जाणून घ्या
व्हॉट्सअॅप कॉल शेड्यूल करण्यासाठी फोनमध्ये सर्वात आधी अॅप ओपन करा. यानंतर ज्या ग्रुपवर जिथे कॉल शेड्यूल करायचा आहे. ग्रुपमध्ये गेल्यानंतर मेसेज बारच्या खाली लेफ्ट साईडला एक प्लस चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा. तर राईट साईडला फोटो, कॅमेरा, लोकेशनसह इतर ऑप्शन दिसतील.
यापैकी इव्हेंट आयकॉनवर क्लिक करा. आता इव्हेंट क्रिएट करा आणि त्यासाठी इव्हेंटचं नाव लिहून टाईम सेट करा. जर मिटिंग लिंकच्या माध्यमातून सुरू करायची असेल तर टॉगल ऑन करा. या माध्यमातून तुम्ही व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलपैकी एक सिलेक्ट करू शकता. यानंतर शेवटी सेंड ऑप्शनवर क्लिक करा.
शेड्युल कॉल रद्दही करता येतो, कसं ते जाणून घ्या
कॉल्स शेड्युल केल्यानंतर तुम्हाला काही कारणास्तव जर मीटिंग रद्द करायची वेळ आली तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही मीटिंग आरामात रद्द करू शकता. फक्त चॅटमध्ये जाऊन मीटिंग शेड्युलमध्ये एडिट इव्हेंटवर क्लिक करा. यानंतर कॅन्सलवर क्लिक करा.
व्हॉट्सअॅप चॅट तुम्ही लॉक करू शकता
चॅट लॉक करण्याची प्रोसेसही सोपी आहे. कोणतं चॅट लॉक करायचं त्या चॅटवर जा . यानंतर प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक करा आणि चॅट लॉकच्या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर Lock this chat with fingerprint किंवा Lock this chat with face id यापैकी एक सिलेक्ट करा.