काय काळजी घ्याल?

जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल, तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.

काय करु नये?

हस्तांदोलन
टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
आजारी लोकांशी जवळचा संपर्क
डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

अहवाल सादर करण्याच्या सूचना

चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) अहवालांबाबत चिंतेचे काही कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे. यामुळे या आजाराबद्दल नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकल्यासंबंधित रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, अशा सूचना पुण्यातील आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिल्या आहेत.