MP Lands Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.
जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी
ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.
त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.
त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.
त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा.
तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.
जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी
प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल. नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल.