Edible Oil Prices : नवी मुंबईतील APMC बाजारात खाद्य तेलाचे दर वाढले. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर हे वाढले आहेत. तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचं व्यापार्यांनी म्हटले आहे.
खाद्यतेलाच्या दरात मोठे बदल नवीन दर जाहीर
गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे दराला महागाईची फोडणी बसली आहे. सोयाबीन दरात वाढ आणि केंद्र सरकारच्या 20 टक्के आयात शुल्क लावले आहे. या सर्व घडामोडींमुळे खाद्यतेलाच्या दरात जवळपास 30 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील APMC बाजारात खाद्य तेलाचे दर वाढले. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या एपीएमसी बाजारामध्ये खाद्य तेलाचे दर हे वाढले आहेत. तेलाच्या एका लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ झाल्याचं व्यापार्यांनी म्हटले आहे.
खाद्यतेलाच्या दरात मोठे बदल नवीन दर जाहीर
जनतेच्या रेट्यानंतर दर खाली
दोन वर्षांपूर्वी देशात महागाईची लाट आली होती. पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या होत्या. सोबतच किरकोळ महागाईने डोके वर काढले होते. खाद्यतेलाचा भडका उडाला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनक्षोभ वाढला होता. त्यावेळी सरकारने इतर देशातून पामतेल आणि इतर तेल आयात करण्याचे धोरण आखले. त्यामुळे देशातंर्गत खाद्यतेलाच्या किंमती जमिनीवर आल्या.
खाद्यतेलाच्या दरात मोठे बदल नवीन दर जाहीर
आता केंद्र सरकारने सोयाबीन दर वाढवला आहे. तर 20 टक्के आयात शुल्क आकारणी सुरू केली आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात दरमहा 7 ते 8 टन तेलाची आयात होते. पण मागणी वाढल्याने तेलाची आवक कमी झाली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्याने खाद्यतेलाचा भाव कडाडला आहे. तेलाचे 30 टक्के दर वधारले आहेत, अशी माहिती एपीएमसीमधील व्यापार्यांनी दिली आहे.