ladaki bahin : महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळाले आहेत. या योजनेत २१०० रुपये कधीपासून येणार याकडे सर्वांचेच लक्ष लाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. आता या योजनेत महिलांना २१०० रुपयांची प्रतिक्षा आहे. या योजनेत नवीन वर्षात महिलांना २१०० रुपये येऊ शकतात.