Land Records : राज्य सरकारने 14 जुलै 2023 रोजी तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठीचा प्रारुप जाहीर केला होता. या प्रारुपात तुकडेबंदीवरील नियमांत शिथिलता आणण्याचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. या प्रारुपावर नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे आणि आक्षेपांचे गांभीर्याने विचार करण्यात आले आणि त्यानंतर संबंधित नियम अंतिम करण्यात आले. या सुधारणांची अधिसूचना 14 मार्च 2024 रोजी राजपत्रात प्रकाशित केली गेली.
तुकडेबंदी कायद्याबाबत नवीन नियम लागू
याअंतर्गत, प्रांताधिकाऱ्यांकडून नागरिकांना एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्याची परवानगी दिली जात आहे. यासाठी, पूर्वीच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या दस्तऐवजावर आधारित पाच टक्के शुल्क शासनाला भरावे लागेल. या शुल्काच्या भरपाईनंतर, त्या गुंठ्यांवर खरेदी-विक्रीला परवानगी मिळेल; तथापि, त्या गुंठ्यांचा वापर फक्त विहीर, घर बांधकाम आणि रस्ते या अत्यावश्यक हेतूंसाठीच होईल.
तुकडेबंदी कायद्याबाबत नवीन नियम लागू