‘लाडकी’त नाव कसं शोधाल?
- स्टेप १ : तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत अॅप उघडा आणि लॉगिन करा
- स्टेप २ : डॅशबोर्डवर लाभार्थी अर्जदारांची यादी या बटणावर क्लिक करा
- स्टेप ३ : त्यात आपलं गाव, ब्लॉक, तालुका आणि जिल्हा निवडून शोधा बटणावर क्लिक करा
- स्टेप ४ : त्यानंतर यादीत तुमचं नाव आहे की नाही ते दिसेल
लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करण्यासाठी
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यासाठी सरकारने तब्बल 4500 कोटींची तरतूद केली… तर आता पुन्हा हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यातून लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींना मंजूरी देण्यात आलीय.. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता मिळण्यापुर्वी लाडक्या बहीणींनी आपलं नाव यादीत आहे की नाही? याची खात्री करून घ्यायला हवी. अन्यथा पश्चाताप करण्याशिवाय कोणताच पर्याय हाती राहणार नाही.